‘आता संयमाचा बांध तुटणारच!’ जालन्यात जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
जालन्यात पत्रकारांशी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत त्यांनी ‘आता संयमाचा बांध तुटणारच आहे’, असा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही जरांगे यांनी सरकारला घेरले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी आणि गावागावात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास मराठा समाजाने मोठ्या ताकदीने एकत्र यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
🚨 ‘आता संयमाचा बांध तुटणारच!’
🔥 जालन्यात जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
🌾 शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची मदत द्या
🚩 नारायणगड दसरा मेळाव्यासाठी मोठं आवाहन
#ManojJarangePatil #JarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #Jalna #MaharashtraPolitics #Maratha #Narayangad #DussehraMelava #MaharashtraNews