अकोला: श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अधिवेशन उत्साहात संपन्न
Akola, Akola | Nov 2, 2025 अकोला : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचालित श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४८वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सयंकाळी 6 वाजता उत्साहात पार पडले. अध्यक्ष डॉ. विलास खंदारे, अध्यक्षस्थानी हर्षवर्धन देशमुख तर उद्घाटक आमदार रणधीर सावरकर होते. अधिवेशनात “धोके व परताव्याचे सिद्धांत”, “डॉ. मनमोहन सिंह यांचे अर्थशास्त्रीय विचार” आणि “महाराष्ट्रातील व्यसनाधीनतेचे सामाजिक-आर्थिक पैलू” या विषयांवर चर्चा झाली. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख खुले सभागृह