नागपूर शहर: हॉटेल संगम लॉजच्या रिसेप्शनिस्ट वर जीवघेणा हल्ला, आरोपी ताब्यात
कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल संगम लॉज येथे रात्री ११:३० ते १२ च्या दरम्यान ही घटना घडली. हॉटेल लॉजवरील रिसेप्शनिस्ट निलेश पुसाडोके यांच्यावर हा हल्ला झाला. मोहम्मद आरिफ मोहम्मद अब्दुल है असे आरोपीचे नाव आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने घरी जाऊन लाकडी फळी आणली आणि निलेश यांच्या डोक्यात गंभीर दुखापत केली.आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.जखमी निलेश पुसाडोके यांची प्रकृती स्थिर आहे.