रामटेक: पेंच व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांसाठी आता पगमार्क पाणवठे ; पेंच मध्ये वन्यप्राणी संवर्धनाचा अनोखा प्रयोग
Ramtek, Nagpur | Mar 21, 2026 उन्हाळ्याच्या झळा आता सुरू झाल्या आहेत. यापासून वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने आता एक नवीन अनोखा आणि अभिनव उपक्रम राबविला आहे. वाघांच्या पावलांच्या ठशे अर्थात पगमार्क आकाराचे पानवठे तयार करून वनसंवर्धनासोबतच पर्यावरणालाही नवी दिशा दिली आहे. शनिवार दिनांक 20 मार्चला याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरात आता निसर्ग आणि कलात्मकतेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.