Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

📍शाळकरी मुलींना छेडणाऱ्या दोघांपैकी एकाला नागरिकांनी व पालकांनी दिला चांगला चोप- केले एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन

Latur, Latur | Jul 10, 2026

MORE NEWS

सराईत वीजतार चोरांच्या मुसक्या आवळल्या, २१ गुन्हे उघडकीस; सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.किल्लारी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.

            लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत सराईत वीजतार चोरट्यांच्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या वीजतारा तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहने असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यातील २१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

                 अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांनी विशेष पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातत्याने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

               दि. १२ जुलै २०२६ रोजी किल्लारी गावात एक संशयित इसम वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव 

१)आकाश गोपाळ देंडे (वय ३१, रा. किल्लारीवाडी, ता. औसा, जि. लातूर) 

                असे सांगितले. अधिक चौकशीमध्ये त्याने किल्लारी परिसरात महावितरणच्या विद्युत खांबावरील वीजतारा चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यातील साथीदारांची माहितीही पोलिसांना दिली.

               त्याच्या कबुलीजबाबावरून

२) अविनाश अजाप्पा कोमारे (वय २५, रा. शिवनगर, ता. निलंगा, जि. लातूर) 
                    याला ताब्यात घेण्यात आले. त्यानेही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. आरोपींकडून २ लाख ४८ हजार रुपयांच्या चोरीच्या विद्युत तारा, चोरीसाठी वापरलेली एक मोटारसायकल (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) आणि एक मालवाहू छोटा हत्ती (अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये) असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            तपासादरम्यान आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. २५/२०२६, ७०/२०२६, ८९/२०२६, १०४/२०२६, १४३/२०२६, २४१/२०२६, २४२/२०२६, २४३/२०२६, २४४/२०२६ व २४५/२०२६ (कलम १३६, वीज अधिनियम) या गुन्ह्यांची तसेच ११ अदखलपात्र मालमत्ता विषयक गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

                  या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.

                ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशन मरडे, सहाय्यक फौजदार गणेश यादव, पोलीस अमलदार महेश पवार, शिवप्रसाद करके, कृष्णा गायकवाड, नितीन चव्हाण, शिरसमकर, आकाश सरतापे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेश कंचे, अर्जुन रजपूत, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, रसूल पठाण आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सराईत वीजतार चोरांच्या मुसक्या आवळल्या, २१ गुन्हे उघडकीस; सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.किल्लारी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत सराईत वीजतार चोरट्यांच्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या वीजतारा तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहने असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यातील २१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांनी विशेष पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किल्लारी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातत्याने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. दि. १२ जुलै २०२६ रोजी किल्लारी गावात एक संशयित इसम वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव १)आकाश गोपाळ देंडे (वय ३१, रा. किल्लारीवाडी, ता. औसा, जि. लातूर) असे सांगितले. अधिक चौकशीमध्ये त्याने किल्लारी परिसरात महावितरणच्या विद्युत खांबावरील वीजतारा चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यातील साथीदारांची माहितीही पोलिसांना दिली. त्याच्या कबुलीजबाबावरून २) अविनाश अजाप्पा कोमारे (वय २५, रा. शिवनगर, ता. निलंगा, जि. लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानेही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. आरोपींकडून २ लाख ४८ हजार रुपयांच्या चोरीच्या विद्युत तारा, चोरीसाठी वापरलेली एक मोटारसायकल (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) आणि एक मालवाहू छोटा हत्ती (अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये) असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. २५/२०२६, ७०/२०२६, ८९/२०२६, १०४/२०२६, १४३/२०२६, २४१/२०२६, २४२/२०२६, २४३/२०२६, २४४/२०२६ व २४५/२०२६ (कलम १३६, वीज अधिनियम) या गुन्ह्यांची तसेच ११ अदखलपात्र मालमत्ता विषयक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास किल्लारी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशन मरडे, सहाय्यक फौजदार गणेश यादव, पोलीस अमलदार महेश पवार, शिवप्रसाद करके, कृष्णा गायकवाड, नितीन चव्हाण, शिरसमकर, आकाश सरतापे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेश कंचे, अर्जुन रजपूत, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, रसूल पठाण आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Latur, Latur | Jul 14, 2026

"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!

"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!

Latur, Latur | Jul 14, 2026

ईदगाह कमिटीतर्फे पावसासाठी विशेष नमाज व दुआ; १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन
उदगीर | प्रतिनिधी
उदगीर परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ईदगाह कमिटी, उदगीर यांच्या वतीने मंगळवार, १४ जुलै रोजी पावसासाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्का व सामूहिक दुआचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी उदगीर शहर व परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी १०.०० वाजता ईदगाह मैदानावर उपस्थित राहून नमाज व दुआमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ईदगाह कमिटीने केले आहे.
या वेळी चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभावी तसेच अल्लाहची रहमत सर्वांवर कायम राहावी, यासाठी विशेष दुआ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही ईदगाह कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

ईदगाह कमिटीतर्फे पावसासाठी विशेष नमाज व दुआ; १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन उदगीर | प्रतिनिधी उदगीर परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ईदगाह कमिटी, उदगीर यांच्या वतीने मंगळवार, १४ जुलै रोजी पावसासाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्का व सामूहिक दुआचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी उदगीर शहर व परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी १०.०० वाजता ईदगाह मैदानावर उपस्थित राहून नमाज व दुआमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ईदगाह कमिटीने केले आहे. या वेळी चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभावी तसेच अल्लाहची रहमत सर्वांवर कायम राहावी, यासाठी विशेष दुआ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही ईदगाह कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

Latur, Latur | Jul 13, 2026

📍मनसुन्न करणारी घटना रेणापूर च्या माकेगावात ट्रॅक्टर अंगावर घालत सावत्र भावाने भावाला कुऱ्हाडीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न.
जीवे मारणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.

📍मनसुन्न करणारी घटना रेणापूर च्या माकेगावात ट्रॅक्टर अंगावर घालत सावत्र भावाने भावाला कुऱ्हाडीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न. जीवे मारणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.

Latur, Latur | Jul 13, 2026

१९ वर्षांची अखंड सेवा… अविरतपणे आज हि सुरु ..
माजी  आमदार आदरणीय श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली नेत्र तपासणी शिबिराची सेवाभावी परंपरा गेली १९ वर्षे अखंडपणे जोपासली जात आहे. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही गरजू नागरिकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 दिनांक : १४ जुलै २०२६
📍 स्थळ : JSPM शैक्षणिक संकुल, MIDC Campus लातूर येथे 

हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या एका Share मुळे एखाद्या गरजू व्यक्तीला योग्य तपासणी, योग्य उपचार आणि पुन्हा स्पष्ट दिसण्याची आशा मिळू शकते.

चला, सेवाभावाच्या या उपक्रमात सहभागी होऊया आणि अधिकाधिक गरजूंपर्यंत दृष्टीची ही मदत पोहोचवूया!

१९ वर्षांची अखंड सेवा… अविरतपणे आज हि सुरु .. माजी आमदार आदरणीय श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली नेत्र तपासणी शिबिराची सेवाभावी परंपरा गेली १९ वर्षे अखंडपणे जोपासली जात आहे. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही गरजू नागरिकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 📅 दिनांक : १४ जुलै २०२६ 📍 स्थळ : JSPM शैक्षणिक संकुल, MIDC Campus लातूर येथे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या एका Share मुळे एखाद्या गरजू व्यक्तीला योग्य तपासणी, योग्य उपचार आणि पुन्हा स्पष्ट दिसण्याची आशा मिळू शकते. चला, सेवाभावाच्या या उपक्रमात सहभागी होऊया आणि अधिकाधिक गरजूंपर्यंत दृष्टीची ही मदत पोहोचवूया!

Latur, Latur | Jul 13, 2026

📍शाळकरी मुलींना छेडणाऱ्या दोघांपैकी एकाला नागरिकांनी व पालकांनी दिला चांगला चोप- केले एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन - Latur News