रामटेक: खरपडा - सावंगी मार्गावर वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय इसम जबर जखमी
Ramtek, Nagpur | Apr 11, 2026 देवलापार उपविभागात वाघांचे हल्ले निरंतर सुरूच आहेत. अशातच शनिवार दिनांक 11 एप्रिलला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या खरपडा - सावंगी मार्गावर खरपडा निवासी दिवाळू नारू कोकोडे, वय 65 वर्ष हे सावंगी गावाकडे जात असताना त्यांच्यावर एका वाघाने अचानक हल्ला केला. यात दिवाळू यांची वाघासोबत झटापट झाली. या हल्ल्यात दिवाळू हे गंभीर जखमी झाले.