उत्तर सोलापूर: रात्री जेवण करुन घरातून निघाला;सकाळी बाळे परिसरात रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या..!
एका २३ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.२ अक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.अविनाश सीताराम मल्लाव रा.तिर्हे असे त्या तरुणाचे नाव आहे.ही घटना बाळे परिसरातील रेल्वे रुळावर घडली. माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले अशी माहिती सिव्हील पोलीसांनी दिली.