रामटेक: रामटेक शहरात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Ramtek, Nagpur | Apr 14, 2026 भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रामटेक शहरातील विविध चौक, बुद्ध विहार, शासकीय कार्यालय, संस्था,शाळा, महाविद्यालयात विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंगळवार दिनांक 14 एप्रिल ला सकाळपासून सायंकाळपर्यंत करण्यात आले आहे. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने रामटेक शहरात मोठा उत्साह दिसत आहे.