जालना आज दि. ३/२/२६ राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय रुग्णालयात बालकांचे लसीकरण मोफत करण्यात येते. पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षयरोग, हेपटायटिस बी, घटसर्प, डांग्या खोकला, न्यूमोनिया, अतिसार, रूबेला इत्यादी आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरणांमध्ये प्रभावी लसी दिल्या जातात तसेच विटामिन ए - रात आंधळेपणा टाळण्यासाठी डोस देण्यात येतो. या लसीमुळे बाल मृत्यू दर कमी होतो. आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आपल्या बाळांचे लसीकरण पूर्ण करून घ्या.