किनवट: सेवा संकल्प अभियान
तोटंबा उपकेंद्रात सिकलसेल तपासणी व जनजागृती मोहीम संपन्न!
493 views | Nanded, Maharashtra | Oct 2, 2026 नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी अंतर्गत उपकेंद्र तोटंबा येथे 'सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान' राबवण्यात आले. सिकलसेल हा आनुवंशिक रक्ताचा आजार असून हिमोग्लोबिन कमी होणे, सांधेदुखी, तीव्र थकवा आणि हात-पायांवर सूज ही याची प्रमुख लक्षणे आहेत. आरोग्य पथकाकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता त्वरित तपासणी व उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. #किनवट #नांदेड #सिकलसेल #सार्वजनिकआरोग्य #PublicApp