🚨 डायल 112 च्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना मिळाले जीवदान 🚨
त्रिवेणी संगम येथे पुलावरून मालवाहू वाहन नदीपात्रात कोसळून गंभीर अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
क्रेनच्या सहाय्याने वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांची तत्परता, समन्वय आणि डायल 112 च्या जलद प्रतिसादामुळे जखमींचे प्राण वाचविण्यास मदत झाली.
या संपूर्ण बचावकार्यामध्ये पो.शि. महेश माने, पोलीस स्टेशन परतवाडा 112 चालक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
🚨 आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 — नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर
📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930
Follow Us : @amravatiruralpolice
#AmravatiRuralPolice
#Dial112
#EmergencyResponse
#PoliceHelp
#RoadAccident
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.
591 views | Amravati, Maharashtra | Jun 6, 2026