अंबरनाथ: आमदार बालाजी किणीकर यांच्या निधीतून वडवली सेक्शन परिसरात रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
आज सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान अंबरनाथ पूर्व येथिल वडवली सेक्शन परिसर येथे संजय अपार्टमेंट ते गार्डन परिसर पर्यंत आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या निधीतून तसेच शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज व माजी नगरसेविका विना उगले यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी स्थानिक महिला नागरिक व जेष्ठ नागरिक अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.