आज शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की लासूर स्टेशन पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सेवेला बळकटी देणाऱ्या सर्व सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या नव्या इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, विविध वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. या कार्यक्रमास आरोग्याधिकारी, आरोग्य सेवक तसेच सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.