नागपूर शहर: राहुल गांधींच्या अटकेचे नागपुरात तीव्रसाद; मध्यरात्री भाजप कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन, काँग्रेस भाजपा आमने-सामने
राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ नागपुरातील गणेशपेठ येथील भाजप कार्यालयासमोर मध्यरात्री युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजप युवा मोर्चाने शहर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत कठोर कारवाईची मागणी केली. म