मुंबईतील नालेसफाई कामाची श्वेतपत्रिका काढा: खासदार वर्षा गायकवाड
आज दिनांक 28 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील नालेसफाई कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आम्ही सातत्याने यावर आवाज उठवत आहोत मात्र राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेने याची चौकशी एसिबी मार्फत करावी व यावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.