रामटेक: बायपास रोड,रामटेक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला.
Ramtek, Nagpur | Apr 4, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या रामटेक शहराच्या बायपास मार्गावरील मुरमुरा भट्टी जवळ स्थानिक गुन्हे शाखा नागपूरच्या पथकाने शनिवार दिनांक 4 एप्रिल ला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कारवाई करीत तुमसर कडून रामटेक मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या अवैधरित्या विनापरवाना विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणाऱ्या एका 12 चक्का टिप्परला पकडून जप्तीची कारवाई केली.