सांस्कृतिक लोककला मंच (ऑल इंडिया) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय 'उद्घाटन समारंभ व भव्य कलावंत गायन मेळावा' कळमेश्वर येथील संत्रा मंडी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीवजी पोतदार साहेब,कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षस्थान स्थानिक आमदार डॉ. आशिषजी देशमुख यांनी भूषविले.