बुलढाणा शहरातील जांभरून रोड परिसरातील गुरुद्वारा साहिब येथे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता गुरुनानक जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी गुरुद्वारास भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले आणि गुरुनानक देवजींच्या पवित्र उपदेशांचा आशीर्वाद घेतला.