रोहा: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल २०२६ मध्ये तिकीट तपासणीतून रु. १६.१३ कोटींचे उत्पन्न
Roha, Raigad | May 4, 2026 मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०२६ महिन्यात रु. १६.१३ कोटी इतके तिकीट तपासणी उत्पन्न नोंदवत मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. हा मासिक उत्पन्नाचा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा असून मे २०२३ मध्ये नोंदविण्यात आलेल्या रु. १४.५० कोटींच्या आधीच्या विक्रमापेक्षा अधिक आहे.