रामटेक: अंबाळा जलाशयात एका 40 वर्षीय युवकाने घेतली उडी: तो अद्याप हाती लागला नाही
Ramtek, Nagpur | Apr 23, 2026 रामटेक शहरा नजीकच्या प्रसिद्ध अंबाळा तलावात गुरुवार दिनांक 23 एप्रिल ला दुपारी एक वाजता च्या दरम्यान दारूच्या नशेत तलावाच्या किनाऱ्यावर वावरत असलेल्या एका चाळीस वर्षे तरुणाने अचानक तलावात उडी घेतली. यानंतर गटांगळ्या खात तो तलावात बुडाला. मृतकाचे नाव परीक्षित प्रभाकर सायरे वय 40 वर्षे रा. इंगोले चौक वर्धा असे सांगण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत त्याचा तपास होऊ शकला नव्हता. शुक्रवारला सकाळी एनडीआरएफ ची टीम येऊन त्याचा तपास करणार आहे.