रामटेक: बोरडा सराखा येथील तरुणाचा तुमसर येथे संशयास्पद मृत्यू
Ramtek, Nagpur | Apr 20, 2026 रामटेक तालुक्यातील बोरडा सराखा येथील 36 वर्षीय तरुणाचा भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 20 एप्रिलला समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकाचे नाव राजेश शेरकुरे वय 36 वर्षे रा. बोरडा सराखा असे असून तो तुमसर तालुक्यातील एका गावात लग्नकार्यासाठी गेला होता. यानंतर तो पोलीस स्टेशन तुमसर हद्दीत येणाऱ्या घनकचरा संकलन केंद्राजवळ पाण्यात तरंगताना आढळला.