प्रतिबंधित सुगंधित पान मसाला गुटखा अन्न औषध प्रशासनाने तपोवन रोड कोठावदे पेपर मिलच्या मागे सात जानेवारी रोजी जप्त करून आठ जानेवारी रोजी रात्री उशिरा भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा देविदास महाजन यांच्या फिर्यादीनुसार तपोवन रोड कोठावदे पेपर मिलच्या मागे प्रतिबंधित असलेला पान मसाला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली.त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून मुद्देमाल जप्त केला आहे.