सेनगाव: प्रति पंढरपूर आजेगांव येथे आषाढी एकादशी निमित्त केशवराज महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सेनगांव तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख आजेगांव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने केशवराज महाराजांचा भव्य यात्रा महोत्सव आज आयोजित करण्यात आला असून दर्शनासाठी पंचक्रोशीतील भावीकांनी मोठी गर्दी केली. मागील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या केशवराज महाराज यात्रेला पारंपारिक पद्धती नुसार सकाळी पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.आजेगांव येथील केशवराज महाराजांना प्रति विठ्ठल म्हणून ओळखले जाते. दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 6 वाजता पासून भाविकांनी गर्दी केली.