नागपूर शहर: दाभा येथे किरायाच्या घरी इतर महिलांमध्ये वाद झाल्याने 25 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पोलीस स्टेशन गिट्टीखदान अंतर्गत येणाऱ्या दाभा येथे विदिशा मरडेवार वय 25 वर्ष ही घरी असताना किरायाच्या घरामध्ये इतर महिलांसोबत तिचा वादविवाद झाल्याने रागाच्या भरात तिने सिलिंग फॅनला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.