“नशेकडे नाही, निरोगी आयुष्याकडे होकार”
महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने आज शहरात अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. विविध शाळांतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नशामुक्तीचा संदेश दिला.
या अभियानाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निलोत्पल व उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते झाले. राजर्षी शाहू स्मारक येथे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पदयात्रा, शॉर्ट फिल्म, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सामूहिक शपथ यांद्वारे नशामुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला.
समाजामध्ये जनजागृती निर्माण करून सुरक्षित, निरोगी आणि नशामुक्त कोल्हापूर घडविण्यासाठी कोल्हापूर पोलीस सातत्याने कार्यरत आहेत.
#KolhapurPolice #DrugFreeKolhapur #NashaMuktKolhapur #AwarenessRally #StudentAwareness #SafeKolhapur
9 views | Kolhapur, Maharashtra | Jul 9, 2026