उरुळी देवाचीतील लोखंड व्यापाऱ्याकडे बिश्नोई गँगच्या' नावाने 50 कोटींच्या खंडणीची मागणी; गोदामावर 4 राउंड गोळीबार तर कुटुंबाला दिली जीवे मारण्याची धमकी..
फुरसुंगी, (पुणे) : उरुळी देवाची येथील मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर असलेल्या एका प्रसिद्ध पाईप आणि स्टील गोदामावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 राउंड फायर करीत गोळीबार केला आहे. कुप्रसिद्ध 'लॉरेन्स बिश्नोई गँग'चा हस्तक आरजू बिश्नोई याने कंपनीच्या संचालकांना व्हॉट्सॲप कॉल करून तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली असून, पैसा न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची थेट धमकी दिली आहे.
हि घटना सोमवारी (ता. 22) सायंकाळी साडेचार वाजलेपासुन ते रात्रौ साडेनाऊ वाजेपर्यंत सर्वे नं ३२/५ ३३/२बी,३५/१/२, मंतरवाडी-कात्रज बायपास रोड, कचरा डेपोच्या समोर, उरुळी देवाची, ता. हवेली, जि पुणे येथील ऑफिसवर लोखंड व्यावसायिक अमुल राजेंद्र चमडीया, वय 41, धंदा व्यवसाय, रा. महमदवाडी, हडपसर यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात बिश्नोई गँगच्या आरजू बिश्नोई विरुद्ध आर्म ॲक्टसह कडक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
.
.
#BishnoiGang #PuneCrime #FiringInPune #Extortion #UruliDevachi #Fursungi #PunePolice #LawrenceBishnoi #BreakingNews #MarathiNews
Haveli, Pune | Jun 23, 2026