कळमेश्वर: इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स भविष्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र:- आमदार डॉ राजीव पोतदार
इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स हे भविष्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र असून युवा पिढीसाठी मोठ्या संधी निर्माण करणारे आहे त्यामुळे या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी श्रीकांत भारतीय यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ राजीव पोतदार यांनी केली