रामटेक: रामटेक - संग्रामपूर -काचुरवाही मुख्य जिल्हा मार्गावर नहराच्या जर्जर पुलाच्या निर्माणाला मंजुरी मिळाल्याने आंदोलन स्थगित
Ramtek, Nagpur | May 19, 2026 रामटेक -संग्रामपूर- काचुरवाही मुख्य जिल्हा मार्गावरील पेंच नहराच्या जर्जर पुलाच्या निर्माणाला मंजुरी मिळाल्याने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह उर्फ गजू यादव यांनी मंगळवार दिनांक 19 मेला दुपारी दोन वाजता पाटबंधारे उपविभाग कार्यालय रामटेक समोर पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगीत करण्यात आले. हा पूल मागील एक वर्षापासून मोठ्या वाहतुकीस बंद करण्यात आला होता.