हिंगणघाट: सावली वाघ येथे पावसाने घर कोसळून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबाची तहसीलदारांकडून दखल, ग्रामपंचायतमध्ये विसावा
हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ पावसाने घर पडून. संसार उघड्यावर व कुटुंब स्नानगृहात. मदतीची वाट बघत थकले.अखेर तहसीलदार योगेश शिंदे यांनी दखल घेतली असून मायलेकास ग्रामपंचायतची ओसरी मिळाली आणि आता इतरही मदत लागू होणार आहे. सावली वाघ येथील काहीसे मतिमंद असलेल्या वृद्ध आई व मुलाची ही कथा.गावातच राहून मिळेल ते काम करीत स्वतःचे व आईचे पोट भरीत जीवन जगणाऱ्या श्रीराम डंभारे यांची आपत्ती मन पिळवटून टाकणारी आहे.आता याची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे.