दिनांक 11 फेब्रुवारी रोजी स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाला मुंबईवरून अमरावती मार्गे नागपूरकडे येणाऱ्या खाजगी बस मध्ये अमली पदार्थ वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा नसून नागपूर अमरावती महामार्गावर गोणखरी नाक्याच्या काही अंतरावर खाजगी बसला थांबविले तेव्हा बस मध्ये पावडर मिळून आले यावरून अंशुल गजभिये याला अटक करण्यात आली व त्याच्याकडून चार लाख चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्यात साखळी पुरावे जोडत पोलीस पथक तपास करून आरोपींचा शोध घेत आहे