Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: सावधान! नागपूर ग्रामीणमध्ये अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; ३० वाहनांवर गुन्हा दाखल, परवाने होणार रद्द

Narkhed, Nagpur | May 22, 2026
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीरपणे रेती वाहून नेणाऱ्या ३० वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांच्या चालक आणि मालकांवर रेती चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील २५ आरोपींवर यापूर्वीही रेती चोरीचे गुन्हे नोंद आहेत.