नागपूर शहर: नागपूरचा ऐतिहासिक 'मस्कऱ्या गणपती उत्सव': पितृपक्षातील अनोखी सांस्कृतिक परंपरा
नागपुरात पितृपक्षात सुरू होणाऱ्या 'मस्कऱ्या' म्हणजेच 'हडपक्या' गणपती उत्सवाला ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. भोसले घराण्याकडून ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.बंगालच्या स्वारीवरून विजयी होऊन नागपुरात परतताना कुळाचारातील गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पितृपक्षात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या उत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न देता त्यात नकला, खडी गंमत, लावण्या, भजन आणि पोवाडे यांसारख्या विविध लोककलांचा समावेश करण्यात आला.