रोहा: कोकण मार्गावर मध्य रेल्वेकडून ४ वातानुकूलित विशेष गाड्या
Roha, Raigad | Apr 9, 2026 उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११२९ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल आणि १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री ००.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.