Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
image
image

सायबर सुरक्षेबाबत अमरावतीत पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी विशेष कार्यशाळा दि. 15/07/2026 रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमरावती शहर, अमरावती ग्रामीण आणि वर्धा येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सायबर विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सायबर फसवणूक, डिजिटल पुरावे, सोशल मीडिया गुन्हे, ऑनलाइन आर्थिक गुन्हे तसेच महिलां व बालकांवरील सायबर गुन्ह्यांचा तपास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करून तपास अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती देण्यात आली. या कार्यशाळेस एकूण 155 पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. नागरिकांना आवाहन करण्यात आले की, ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा https://www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. सदर कार्यक्रम मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत मा. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्री. श्याम घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक श्री, संतोष जाधव व फोरेन्सीक तज्ञ तथा कन्सटंट श्री. राहुल करांडे यांनी मार्गदर्शन केले.. #cybersecurity #maharshtrapolice #AmravatiCItyPolice

92 views | Amravati, Maharashtra | Jul 16, 2026