Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

लातूर: औसा रोडवरील अतिक्रमणाला अखेर लगाम? गोपी साठे यांच्या कारवाईची सुरुवात; झाडावरचे वीज मीटर ठरले धोक्याचे!

Latur, Latur | May 31, 2026

MORE NEWS

उदगीरात पोलीस वसाहतीच्या बाजूस लागूण असलेल्या आडत मोंढ्यातील चार दूकाने चोरट्यांनी फोडले 

घटना सिसीटिव्ही कॅमैर्‍यात कैद ...

उदगीरात पोलीस वसाहतीच्या बाजूस लागूण असलेल्या आडत मोंढ्यातील चार दूकाने चोरट्यांनी फोडले घटना सिसीटिव्ही कॅमैर्‍यात कैद ...

Latur, Latur | Jul 28, 2026

दसनाम गोसावी समाज लातूर व गोसावी वुमन्स विंग लातूर यांची पत्रकार परिषद.

दसनाम गोसावी समाज लातूर व गोसावी वुमन्स विंग लातूर यांची पत्रकार परिषद.

Latur, Latur | Jul 28, 2026

📍प्रवाशाने स्टेअरिंग ओढताच निलंगा आगाराची बस दोन स्कूलबसवर धडकली; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
लातूर, दि. २७ (प्रतिनिधी) – लातूर–औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक अपघातात निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखून बस मोकळ्या जागेत नेल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे निघाली होती. पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंगला हात घालत ते वळविल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली.
या अपघातात एमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूलबसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची नावे वृत्त लिहिपर्यंत समजू शकली नव्हती.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, बसने दोन स्कूलबसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. त्या वेळी स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, अपघातानंतर सुमारे अर्धा तास उलटूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, स्टेअरिंग ओढल्याचा आरोप असलेल्या प्रवाशाबाबतही चौकशी केली जात आहे.
या अपघातामुळे लातूर–औसा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण, संबंधित प्रवाशाची भूमिका आणि त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📍प्रवाशाने स्टेअरिंग ओढताच निलंगा आगाराची बस दोन स्कूलबसवर धडकली; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली लातूर, दि. २७ (प्रतिनिधी) – लातूर–औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक अपघातात निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखून बस मोकळ्या जागेत नेल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे निघाली होती. पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंगला हात घालत ते वळविल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात एमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूलबसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची नावे वृत्त लिहिपर्यंत समजू शकली नव्हती. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बसने दोन स्कूलबसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. त्या वेळी स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, अपघातानंतर सुमारे अर्धा तास उलटूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, स्टेअरिंग ओढल्याचा आरोप असलेल्या प्रवाशाबाबतही चौकशी केली जात आहे. या अपघातामुळे लातूर–औसा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण, संबंधित प्रवाशाची भूमिका आणि त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latur, Latur | Jul 28, 2026

लातूर: औसा रोडवरील अतिक्रमणाला अखेर लगाम? गोपी साठे यांच्या कारवाईची सुरुवात; झाडावरचे वीज मीटर ठरले धोक्याचे! - Latur News