अंबड: अंबड शहर जालना शहराचा पाणी पुरवठा सुरळीत
Ambad, Jalna | Mar 2, 2026 काल संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनी, अंबड येथे मुख्य जलवाहिनीवरील स्कोअर व्हॉल्वचा स्पिंडल स्लिप झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली. काही वेळ परिसरात पाण्याचे लोट वाहत होते. घटनेची माहिती मिळताच जालना महा नगर परिषद च्या देखभाल व दुरुस्ती पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य जलवाहिनी बंद करण्यात आली. त्यानंतर लाईनमधील पाणी पूर्णपणे खाली करून खराब स्कोअर व्हॉल्व काढून नवीन व्हॉल्व बसविण्यात आला. अखंड मेहनतीनंतर आज सकाळी ९ वाजता पाणीप