राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिय असणा-या 'नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा' आणि 'नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा' विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात संपन्न झाल्या. राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या 128 शरीरसौष्ठवपटूंमधून कोल्हापूरच्या अजिंक्य रेडकर यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत दीड लाख बक्षिस रक्कमेसह 'नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू 2025 - 26' किताबासह मानाचा नवी मुंबई महापौर श्री चषक स्विकारला. सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी 50 हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले.