नरखेड: अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात कोंढाळी पोलिसांना यश
Narkhed, Nagpur | Jun 19, 2026 कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी यशस्वी शोध लावला आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, तांत्रिक माहितीच्या आधारे ही मुलगी कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तिला शोधून सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन केल