रामटेक: चोर बाहुली मोगरा तलावात बुडून 58 वर्षीय गुराख्याचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Jul 29, 2026 पोस्टे देवलापार अंतर्गत येणाऱ्या चोरबाहुली मोगरा तलावात बुडून एका 58 वर्षीय गुरख्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 29 जुलैला सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे. मृतकाचे नाव शंकरदयाल हरीराम शरणांगत रा. डोंगरी पो. भोंदेवाडा असे आहे. तलावाच्या परिसरात तो म्हशी चारावयास गेला होता. तलावाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने शंकर दयाल याचा तोल जाऊन तो बुडाल्याचे सांगण्यात आले आहे.