जाफराबाद: सावंगी येथे शेतकऱ्यांच्या जनावराच्या गोठ्याला अज्ञाताने लावली आग,शेती अवजारे व चारा जळून खाक
आज दिनांक 1 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथे शेतकरी शिवाजी साहेबराव वर्गणी यांच्या गोठ्याला काल दिनांक 31 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली या आगीत त्यांनी जनावरांसाठी साठवून करून ठेवलेला चारा व शेती अवजारे पूर्णतः जळून खाक झाले असून सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही मात्र सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.