हिंगोली: आनंद मस्के यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सत्कार
हिंगोली येथील जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद मस्के यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली असून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हिंगोली जिल्हा पोलीस दलामधील सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पुंजाराव मस्के यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.