रामटेक: रामटेकच्या श्रीरामाचा वनवास आता संपणार,
श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक 2026 विधेयक सभागृहात मंजूर
Ramtek, Nagpur | Jul 10, 2026 शेगाव- शिर्डीच्या धर्तीवर श्रीराम मंदिर रामटेकचा सर्वांगीण विकास संभव नसल्याचा एकमेव मुद्दा आता संपणार आहे. शुक्रवार दि. 10 जुलैला महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सदनात श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक 2026 हे विधेयक मंजूर झाले व राम मंदिर रामटेक येथे लवकरच विश्वस्त व्यवस्था स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता रामटेकच्या श्रीरामाचा वनवास कधी संपणार या प्रश्नाचे उत्तर आता विश्वस्त व्यवस्थेकडे मिळणार आहे.