भिवापूर: पोलिस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 4 जुलै रोजी भिवापूर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवापूर तहसील टी पॉइंट येथे नाकाबंदी केली असता 14 चाकी वाहन मिळून आल्याने वाहन थांबून पाहणी केली असता त्यामध्ये रेतीसाठा मिळून आला ट्रक चालक नामे मोबिन गणित शेख राहणार तालुका पवनी धम्मदीप अमोल वलदे हे मिळून आले पोलिसांनी आरोपी चालकास रेती वाहतुकीच्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही