नागपूर शहर: शिक्षकांना अटक करू नका हो, सहाय्यक शिक्षकांची आर्त हाक; माजी आमदार गाणार यांच्यासह पोलीस उपायुक्तांना निवेदन
संपूर्ण राज्यभरात आता शालार्थ आयडी घोटाळा गाजत असून यामध्ये काल तीन सहाय्यक शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. जे खरंच आरोपी आहे त्यांना अटक करा परंतु शिक्षकांना अशाप्रकारे अटक करू नका अशी आर्त हाक सहाय्यक शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान सहाय्यक शिक्षकांतर्फे आज माजी आमदार नागो गाणार यांच्यासह या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस उपायुक्त यांना निवेदन देखील देण्यात आले.