नाशिक: पंचवटी हिरावाडी येथे घर नावावर देण्याचे सांगून चार लाख पंधरा हजार आठशे रुपयांची फसवणूक
Nashik, Nashik | Jan 8, 2026 घर नावावर करून देतो असे आश्वासन देऊन एकाचे 4 लाख 15 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी अनंत श्रीकांत साठे राहणार तुळजाभवानी मंदिर जवळ भगवती नगर हिरावाडी यांना योगेश कांतीलाल बाविस्कर आणि त्रिवेणी योगेश बाविस्कर यांनी वेळोवेळी संपर्क साधून घराच्या फ्लॅटच्या लोनची कोटक बँकेची सेटलमेंट करून तुमचे घर नावावर करून देतो असे सांगून फिर्यादी यांची फसवणूक केली.