जळगाव लाईव्ह न्यूज । आजच्या युगात करिअरची योग्य निवड, नव्या संधी आणि भविष्यातील दिशा याबाबत विद्यार्थी व पालकांना थेट मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध करिअर समुपदेशक व उच्च शिक्षण संशोधक आनंद मापुस्कर हे प्रथमच जळगावात येत आहेत. रिफ्लेक्शन फाऊंडेशनच्या ‘पालक शाळा’ या उपक्रमाअंतर्गत ‘करिअर निवडताना’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ला.ना. शाळेतील गंधे सभागृहात होईल.
#Jalgaonlivenews #jalgaonlive #jalgaon
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026