नरखेड: बेलोना येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Apr 14, 2026 नरखेड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी आरोपी गंगाधर नासरे वय 68 वर्ष याला पाताळेश्वर मंदिर बेलोना येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित करून सेवन करताना रंगेहात पकडले. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांना धडकी भरली आहे