मंठा: मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे जनआंदोलन; प्रशासनाविरोधात संताप
Mantha, Jalna | May 2, 2026 मंठा तालुक्यात ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून न दिल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे तालुक्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, १३ एप्रिल आणि २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठ