चाळीसगाव: भोरस खुर्द येथे वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याला तीन जणांनी मारहाण
भोरस खुर्द येथील शेत गट क्रमांक १७। २ मधील मोटरसायकलच्या वादातून ५५ वर्षीय शेख युसुफ यांना तीन जणांनी मारहाण केली. मनगटावर कुर्हाड्यानेही मारल्यानं पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.