उत्तर सोलापूर: रेडिमेड कापड कारखान्याच्या मालकाने स्वताच्या कारखान्यात गळफास घेत संपवले जीवन;विडी घरकूल येथील घटना
विडी घरकुल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना विडी घरकुल येथील एका रेडिमेड कापड कारखान्यात 30 वर्षीय मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.मृत व्यक्तीचे नाव लोकेश अनिल बिर्रु (वय 30, रा. विडी घरकुल,असे आहे.लोकेशने काही अंतरावर असलेल्या स्वतःच्या कापड कारखान्यात पंख्याला दोरीच्या सहयाने गळफास घेतली.